Ansuman Industries: ISO 9001:2015 Certified Company
समृद्ध भविष्यासाठी शाश्वत शेती
अंशुमन इंडस्ट्रीज, मृदा पोषणातील नाविन्यपूर्ण उपाययोजनांच्या बळावर दुसऱ्या हरित क्रांतीला नवी दिशा देत आहे. विज्ञानाधारित, पर्यावरणपूरक उपायांद्वारे आम्ही शेतकऱ्यांना अधिक समृद्ध आणि शाश्वत शेतीसाठी सक्षम बनवत आहोत.


सादर आहे ...
साॅइलसोल -ओ®
साॅइलसोल - ओः प्रमुख आणि नाविन्यपूर्ण उत्पादन, वैज्ञानिक पद्धतीने विकसित केलेले सेंद्रिय खत आहे. मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी, पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि अधिक निरोगी व दर्जेदार अन्न उत्पादनाला चालना देण्यासाठी त्याची विशेष निर्मिती करण्यात आली आहे.


उत्पादन एक. फायदे अनेक.
निरोगी माती. भरघोस उत्पादन.
१००% नैसर्गिक व पर्यावरणपूरक – माती, पिके आणि पर्यावरणासाठी पूर्णपणे सुरक्षित.
मातीचे आरोग्य सुधारते – सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवून जमिनीची सुपीकता समृद्ध करते.
मातीतील ओलावा टिकवून ठेवते – प्रमाणापेक्षा अधिक किंवा कमी ओलावा परिस्थितीतही पिकांच्या निरोगी वाढीस चालना देते.
मातीचा सामू (pH) संतुलन – पोषकद्रव्ये प्रभावीपणे उपलब्धतेसाठी मातीचा पीएच संतुलित ठेवण्यास मदत करते.
दीर्घ काळ पोषकद्रव्यांची उपलब्धता – पोषकद्रव्यांची धूप कमी करून मुळांच्या कार्यक्षेत्रातच त्यांची उपलब्धता दीर्घ काळ टिकते.
पोषकद्रव्यांचे शोषणात वाढ – मुख्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये अधिक कार्यक्षमतेने शोषण्यास पिकांना मदत करते.
मातीतील जैविक क्रियाशीलता – उपयुक्त सूक्ष्मजीवांची संख्या वाढवून माती नैसर्गिकरीत्या अधिक सुपीक बनवते.
कठीण माती भुसभुशीत करते – मातीतील हवेचे प्रमाण वाढवून बीज रूजण्यास मदत व रोपांची मर कमी करते.
शेतीतील आव्हाने आणि आमचे उपाय


आजची आधुनिक शेती ही मातीचे खालावत चाललेले आरोग्य, वाढती क्षारता, अन्नद्रव्यांचे असंतुलन आणि लागवडीयोग्य जमिनीचे कमी होत जाणारे क्षेत्र अशा अनेक गंभीर आव्हानांना सामोरी जात आहे. केवळ पारंपरिक शेती पद्धतींवर अवलंबून राहून भविष्यातील वाढत्या अन्नधान्याच्या गरजा पूर्ण करणे शक्य नाही.
याचे उत्तर म्हणजे – सेंद्रिय शेती, शाश्वत शेती.
अंशुमन इंडस्ट्रीजमध्ये आम्ही नवकल्पना, संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालून मातीचे आरोग्य सुधरवण्यासाठी, पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना कमी संसाधनांमध्ये अधिक उत्पादनघेण्यास सक्षम होण्यासाठी मदत करत आहोत. - जबाबदारी आणि शाश्वतता !
निरोगी माती • निरोगी पिके • स्वादिष्ट अन्न • निरोगी भविष्य
अंशुमन इंडस्ट्रीजच का?
नवकल्पनाच आमच्या प्रत्येक कार्याची प्रेरणाशक्ती आहे.
भक्कम संशोधन व विकास (R&D), अत्याधुनिक उत्पादन सुविधा, कठोर गुणवत्ता नियंत्रण मानके आणि अनुभवी तज्ज्ञांच्या बळावर आम्ही आजच्या शेतीसमोरील आव्हानांसाठी परिणामकारक आणि विश्वासार्ह उपाय विकसित करतो.
अनेक उत्पादने तयार करण्याऐवजी आम्ही एकाच उत्कृष्ट उपायावर लक्ष केंद्रित करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे—साॅइलसोल-ओ. त्यामुळे सातत्यपूर्ण गुणवत्ता, उत्कृष्ट कार्यक्षमता आणि शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त मूल्य प्रदान करण्याची आम्ही खात्री देतो.
Anshuman Industries
ISO 9001:2015 Certified Company
SoilSoul O organic manure.
Direct Contact
anshumanindustries@gmail.com
Basant, 135/4 Erandavana, Pune - 411 004, Maharashtra
Customer care : +91 73500 02037
© 2026 Anshuman Industries-ISO 9001:2015 Certified Organic Fertilizer Manufacturer in Pune, Maharashtra.
Second Green Revolution